
हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या बहुचर्चित आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी धारणी येथील न्यायालयाने सुनावण्यात आली होती. या न्यायालयीन कोठडी नंतर आज यात दोन दिवस संपत आले त्यामुळे आज पुन्हा धारणी पोलिसांनी श्रीनिवास रेड्डी यांना न्यायालयात हजर केले. आज हजर केल्यानंतर स्थानिक न्यायालयाने श्रीनिवास रेड्डीला चौदा दिवसाची न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोन दिवस स्थानिक पोलिसांनी रेड्डीची या प्रकरणावर चौकशी केली असून श्रीनिवास रेड्डीने दोन दिवस धारणी येथील कारागृहातच काढले आज सर्वप्रथम धारणी पोलिसांनी रेड्डीला पोलीस स्थानकातून एक वाजता न्यायालयात हजर केले त्यानंतर न्यायालयाचा आत रेड्डीचे वकील मनीष जस वाणी यांनी युक्तिवाद करून या या गुन्ह्यात रेड्डीचा काहीस संबंध नसल्याचा युक्तिवाद केला तसेच रेड्डीला पोलीस कोठडी देण्यात येऊ नये अशी मागणी केली. धारणी न्यायालयाने रेड्डीला पोलिस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांला आज पोलीस बंदोबस्तात अमरावती कारागृहात तपास अधिकारी पुनम पाटील, पोलीस निरीक्षक विलास कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते व त्यांचे चमुने अमरावती कारागृहात घेऊन गेले आहे,



























































