
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यातील शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करावा याबाबत राज्य सरकारने विधिमंडळ अधिवेशनात दाखवलेली हतबलता ही संतापजनक आहे. मराठीबाबत शिक्षणमंत्र्यांनी असे विधान करणे म्हणजे मराठीचे भविष्य अंधारात असून ते राज्याच्या हाती कसे सुरक्षित नाही, हेच दाखवणारे आहे, अशी टीका अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली आहे. तसेच मराठीच्या अपेक्षा राज्य सरकारकडून करायच्या नाहीत तर कुणाकडून करायच्या हेदेखील मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांनी समजावून सांगावे, असा सवाल श्रीपाद जोशी यांनी केला आहे.



























































