हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले

हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेतील इतर तीन अंतराळवीर 18 दिवसांच्या वास्तव्यानंतर सुखरुप पृथ्वीवर परतले आहेत. अ‍ॅक्सिओम स्पेसने एका निवेदनात म्हटले आहे की, “पृथ्वीवर 23 तासांच्या प्रवासानंतर, क्रू सकाळी 4.31 वाजता (मंगळवार भारतीय वेळेनुसार दुपारी 3.021) कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरले आहेत.”

अंतराळामध्ये शुभांशू यांच्याकडून 17 दिवसांमध्ये विविध 60 वैज्ञानिक प्रयोग करण्यात आले. शुभांशूचा हा अनुभव गगनयान मोहीमेसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. तब्बल 23 तासांच्या प्रवासानंतर शुभांशूसह इतर 3 अंतराळवीर पृथ्वीवर दाखल झाले आहेत. या अंतराळ मोहीमेअंतर्गत मेथी, मूग देखील उगवले.

सविस्तर बातमी लवकरच…