
अमेरिकेत 41 दिवसांपासून सुरू असलेले सरकारी शटडाऊन आता लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. सिनेटने या विधेयकाला मंजुरी दिली असून आता हे विधेयक हाऊस ऑफ रिप्रेजेंटिक्सकडे पाठवले जाईल. या ठिकाणी यावर अंतिम मतदान पार पडेल. या ठिकाणी या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल. त्यानंतर सरकारी कामकाज पुन्हा एकदा सुरू होईल.
नुकत्याच झालेल्या मतदानात 60-40 नुसार हे विधेयक पास झाले. सहा आठवडय़ांपासून शटडाऊन सुरू आहे. रिपब्लिकन पार्टीची मागणी होती की, 1 जानेवारीपासून संपणाऱ्या हेल्थकेअर टॅक्स व्रेडिट्सला वाढवण्यासाठी चर्चा करावी, परंतु रिपब्लिकन खासदारांनी असे करण्यास नकार दिला. अखेर पाच डेमोव्रेट्सने विधेयकाचे समर्थन करत त्या बाजूने मतदान केले. अमेरिकेत शटडाऊनमुळे लाखो संघीय कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. हाऊस स्पीकर माइक जॉन्सन यांनी खासदारांना लवकरात लवकर वॉशिंग्टनला परत येण्याचे आवाहन केले आहे. कारण या विधेयकावर मतदान करायचे आहे. आपल्याला हे बिल लवकरात लवकर मंजूर करावे लागणार आहे.



























































