आवश्यकतेपेक्षा मीठ जास्त खाल्ले, तर शरीर देते ‘हे’ संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीठाशिवाय कोणताही पदार्थ खाण्याची आपण कल्पनासुद्धा करून शकत नाही, असे असले तरीही आहारात मिठाची कमतरता किंवा अतिरेक होतो तेव्हा त्याची लक्षणे आपल्या शरीरात दिसू लागतात. शरीरात मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. याचे संकेत शरीर आपल्याला देत असते. जाणून घेऊया, , शरीरातील या संकेतांविषयी –

शरीराला सूज येणे
मीठाचे सेवन केल्याने शरीराला सूज येण्याची शक्यता असते. जेवल्यानंतर काही वेळा तुमचे शरीर सुजल्यासारखे दिसू लागते. किडनीमध्ये काही प्रमाणात सोडियम आढळते. जेव्हा तुमच्या शरीरात जास्त सोडियम मिसळले जाते तेव्हा किडनी जास्त पाणी साठवून ठेवाते. शरीरात मिठाचे सेवन जास्त झाल्यास ही प्रक्रिया घडते. याला वॉटर रिटेंशन असे म्हटले जाते.

घसा सुकणे
जास्त मिठ असलेले पदार्थ खाल्ल्यास तोंड आणि घसा सुकू लागतो. यामुळे सतत तहान लागते.

उच्च रक्तदाब
शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त झाल्यास उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. रक्तदाबातील हा बदल किडनीद्वारे होते. जास्त मीठ खाल्ल्याने मूत्रपिंडांना द्रव उत्सर्जित करणे कठीण होते. यामुळे रक्तदाब वाढतो.

अपुरी झोप
रात्री झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात सोडियम असलेल्या पदार्थांचे सेवन तुम्ही करत असाल तर झोप न येणे किंवा अपुरी झोप होणे, अशा समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागण्याची शक्यता आहे. रात्री झोपण्यापूर्वी जास्त मीठ असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे झोप न येणे, अस्वस्थता आणि रात्री अधूनमधून सतत जाग येणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते.

ह्रदयविकार
आहारात मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्याने ह्रदय विकाराची समस्या उद्भवू शकते. यामुळे ह्रदयाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आहारात मिठाचे प्रमाण संतुलित राखणे आवश्यक आहे.

मळमळणे
आहारात जास्त प्रमाणात मिठाचा समावेश केल्याने पोटात मळमळण्याचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी आहारात मिठाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याची आवश्यकता आहे तसेच तुमचे शरीर हायड्रेट राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करणेही महत्त्वाचे आहे.