
आमदार निधीतून स्वतःच्याच शिक्षण संस्थेसाठी दोन अॅम्ब्युलन्स खरेदी केल्याबद्दल एकनाथ शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड न्यायालयाने पुन्हा दणका दिला आहे.
2014 मध्ये अब्दुल सत्तार मंत्री असताना आमदार निधीमधून 16 लाख रुपयांच्या दोन अॅम्ब्युलन्स स्वतःच्याच प्रगती शिक्षण संस्थेला दिल्या होत्या. कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता तत्कालिक जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक आणि मंत्रालयातील नियोजन विभागातील उपसचिवांनी त्याला नियमबाह्य मंजुरी दिली होती. या संस्थेवर संपूर्ण सत्तार कुटुंब पदाधिकारी आहेत. अॅम्ब्युलन्स देताना सत्तार यांनी ही माहिती लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपल्ली यांनी पोलिसात तक्रार करूनही कारवाई न झाल्याने न्यायालयात धाव घेतली होती.



























































