चांदी अडीच हजारांनी घसरली सोनेही झाले स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीने जो उच्चांक गाठला, त्याला बुधवारी थोडा ब्रेक मिळाला आहे. सराफा बाजारात आज चांदी अडीच हजारांनी स्वस्त झाली, तर सोन्याच्या किमतीत 900 रुपयांची घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 1 लाख 9 हजार 971 रुपयांपर्यंत खाली आला, तर चांदीचा दर 2 हजार 587 रुपयांनी घसरून प्रति किलो 1 लाख 26 हजार 731 रुपये झाला आहे. याआधी चांदी 1 लाख 30 हजार रुपये किलोपर्यंत पोहोचली होती.