सिमोना हालेपने पटकावले विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅम, सेरेनाचा दणदणीत पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

अमेरिकेची अनुभवी टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम सामन्यात पराभव करत रोमानियाच्या सिमोना हालेपने विजेतेपद पटकावले आहे. 6-2, 6-2 अशा सरळ सेटमध्ये तिने सेरेनाला धूळ चारली.

सेरेना विल्यम्सला दिग्गज खेळाडू मार्गरेट कोर्टच्या 24 ग्रॅण्डस्लॅम जेतेपदांची बरोबरी करण्याचे वेध लागले होते. सेरेना विल्यम्स हिने आतापर्यंत 23 ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. मात्र हालेपने सेरेनाचा विजयरथ रोखला असून टेनिस विश्वाला नवी विजेती मिळाली आहे. सिमोना हालेप हिने 2018 साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली असून पाच वेळा तिने ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.