कडधान्य दीर्घकाळ साठवायचं आहे? ‘हे’ करून पहा

कडधान्य खराब होऊ नये यासाठी काही घरगुती उपाय करून पाहा. सर्वात आधी घरी धान्य साठवण्यासाठी काच, प्लॅस्टिक किंवा अॅल्युमिनियमचे हवाबंद डब्याचा वापर करा. धान्यामध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात काही लवंगा ठेवाव्यात. यामुळे धान्याला कीड लागत नाही आणि धान्याला सुगंधही येतो. तसेच कडुलिंबाची सुकलेली पानेही वापरू शकता.

कडधान्य शक्यतो कोरडय़ा ठिकाणी ठेवावीत. नाहीतर कडधान्याला बुरशी लागू शकते. कडधान्यासाठी ओलावा हा चांगला नाही. वेळोवेळी कडधान्याची तपासणी करा. कडधान्याला कीड लागली असेल तर त्यावर तत्काळ उपाय करता येईल.