
अनेकांकडे संगणक असतो किंवा लॅपटॉप. रोज वापरात येणारे उपकरण असल्यामुळे त्यांची काळजीही योग्य प्रकारे घ्यावी लागते. या दोन्ही उपकरणांचा दोघांचाही डिस्प्ले अतिशय नाजूक असतो. त्यावर सतत धूळ बसते. ती साफ करताना सर्वप्रथम पॉवर सप्लाय बंद करावा. लॅपटॉप थंड होईपर्यंत वाट पाहावी. त्यानंतर मायक्रोफायबर कापडाणे स्क्रीन पुसावी.
स्क्रीनवर काही डाग असतील तर डिस्टील्ड वॉटरने हळुवारपणे पुसावे. या पाण्यात क्षार नसतात. लॅपटॉपसाठी बनविलेल्या खास क्लिनिंग वाईपचादेखील वापर करू शकता.


























































