पाकमध्ये ‘‘सिंधू देश’च्या मागणीला जोर; मोर्चात मोदींचे फलक

पाकिस्तानातील सिंध प्रांतात स्वतंत्र ‘सिंधू राष्ट्रा’ची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी येथील सान शहरात रविवारी मोठी रॅली काढण्यात आली होती. विशेष म्हणजे पाठिंब्यासाठी या रॅलीत हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील नेत्यांचे फलक झळकले होते.

सान शहरात रविवारी प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये मोर्चेकरांनी मोदींसह जगभरातील प्रमुख नेत्यांचे फोटो असलेले फलक हातात घेऊन या आंतरराष्ट्रीय समुदायाने आमच्या स्वातंत्र्य लढय़ात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. या वेळी मोर्चेकरांनी स्वतंत्र सिंधू राष्ट्राच्या घोषणाही दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या