
सामना ऑनलाईन | बँकॉक
हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी व्ही सिंधूने इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया तुनजुंगचा २३-२१ , १६-२१ , २१-९ असा अटीतटीचा पराभव केला आणि पहिल्यांदाच थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली. स्पर्धेतील महिला एकेरी फायनलमध्ये आता सिंधूची गाठ जपानच्या नोझोमी ओकुहाराशी पडणार आहे. गेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ओकुहाराने सिंधूला पराभूत केले होते . त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी या स्पर्धेद्वारे सिंधूला मिळणार आहे.
जागतिक तिसऱ्या मानांकित सिंधूला तुनजुंगकडून पहिल्या आणि दुसऱ्या गेममधे मोठा प्रतिकार झाला. मात्र दुसरा गेम १६-२१ असा गमावल्यानंतर सिंधूने तिसऱ्या गेममधे आपला तुफानी खेळ करीत २१-९ असा सहज विजय मिळवला. ओकुहाराने उपांत्य लढतीत बिवेन झांगचा २१-१७, २१-१० असा सहज पराभव करीत महिला एकेरीची फायनल गाठली.


























































