
आषाढी एकादशीचे निमित्त साधून कणकवली मधील कासार्डे जांभळवाडी येथील शिवाजी राजाराम डोईफोडे या अवलिया कलाकाराने शेवंती फुलाच्या पाकळीवर विठुरायाची सुबक प्रतिमा साकारली आहे.
शिवाजी राजाराम डोईफोडे यांनी साकारलेल्या विविध कलाकृती यापूर्वी पात्र ठरल्या आहेत. शिक्षणाबरोबरच शिवाजी डोईफोडे या कलाकाराने चित्रकारितेचा छंद जोपासला त्यातून त्याला चित्रकलेच्या व्यवसायाची आवड निर्माण झाली. सध्या रोजगाराचा एक व्यवसाय म्हणून पेंटिंगची ही कामे करत आहे. यातूनच एक भक्तीचा मार्ग म्हणून आषाढी एकादशीचे निमित्त साधून शिवाजी डोईफोडे या अवलिया कलाकाराने शेवंतीच्या फुलाच्या पाकळीवर अत्यंत सुबक अशी विठूरायाची प्रतिमा साकारली आहे. त्यांच्या या विठ्ठलाच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.