
कुडाळ एसटी आगाराने श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी बुधवारी तब्बल 80 बसफेऱया अचानक बंद केल्या. गौरी गणपती सणानिमित्त जादा प्रवासी वाहतुकीसाठी आगाराच्या बसेस ठाणे येथे गेल्याने तसेच गणेश चतुर्थीदिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने कमी भारमानाअभावी या बसफेऱया एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आगार प्रशासनाने घेतला. मात्र, प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या निर्णयाने गणेशभक्तांची मोठी गैरसोय झाली. काहींनी खासगी वाहनांचा आधार घेत घर गाठले. त्यांची मोठी आर्थिक परवड झाली.
गणेश चतुर्थीदिवशी सार्वजनिक सुट्टी असते. या दिवशी काही मार्गावर एसटीला भारमान कमी मिळते तसेच यंदा गौरी गणपतीनिमित्त जादा वाहतुकीसाठी आगाराच्या काही बसेस ठाणे येथे गेल्याने बुधवारी गणेश चतुर्थीदिवशी विविध मार्गांवरील
80 बसफेऱया एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आगार प्रशासनाने घेतला. याबाबत अचानक मंगळवारी रात्री फलक बसस्थानकात लावण्यात आला. त्यामुळे कोकण रेल्वेने गावी दाखल झालेल्या, मालवण व अन्य भागात जाणाऱया मुंबईकर चाकरमान्यांसह गणेशभक्तांची गैरसोय झाली.
ऐन गणेशोत्सवात कोकणवासीयांची घोर फसवणूक, टोलमाफीचा पास देऊनही टोलवसुली