
देवगड व आजूबाजूच्या अवैध धंद्याविरोधात देवगड पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली असुन तालुक्यातील मशवी येथील एका घरातून गैरकायदा, बिगर परवाना बाळगलेल्या गोवा मद्याचा 1 लाख 74 हजार 320 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सोमवारी (16 जून 2025) दुपारी ही घटना मशवी वाडा येथे घडली. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील ठोंबरे यांनी रीतसर फिर्याद दाखल केली आहे. मशवी वाडी येथील घरात अवैध गोवा बनावटीचा साठा बिगर परवाना बाळगलेल्या स्थितीत असल्याची माहिती देवगड पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे देवगड पोलिसांनी घटनास्थळी जात शिताफीने छापा टाकला व अवैध मद्यसाठा ताब्यात घेतला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये बोब्ज लेमन व्होडका 180 मिली 1200 बाटल्या अंदाजे 96,000 हजार रुं किंमतीच्या, हनीब्लेड प्युअर ब्रॅण्डिं 180 मिली 640 बाटल्या, मॅक्डोल न.1 च्या 144 बाटल्या 14,400 रुपयांच्या, डॉक्टर ब्रॅण्डिं 48 बाटल्या 92,000 रुपये किंमतीच्या, डीएसपी ब्लॅक 48 बाटल्या 4800 रुपयांच्या असा एकूण 2,108 बाटल्या 44 बॉक्ससह अंदाजे किंमत 1,74,320 रुपये. हा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा.पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलीस हवालदार आशिष कदम, प्रवीण सावंत, पोलिस कॉन्स्टबल स्वप्नील ठोंबरे या पथकाने ही कारवाई केली. या घटनेतील दोन संशयित आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई)नुसार कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव करीत आहेत