
जिह्यातील सिन्नर, ओझर, मनमाड, भगूर, चांदवड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाचे नगरसेवकपदाचे शिलेदार विजयी झाले आहेत, त्यांनी गुलाल उधळत विजयोत्सव साजरा केला. सिन्नरला सर्वाधिक 14 उमेदवार निवडून आले आहेत.
सिन्नर येथे नगरसेवकपदाच्या 30 जागांपैकी सर्वाधिक 14 जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. या विजयी उमेदवारांमध्ये 1 (अ)- सविता सुनील खोळंबे (1096), 2 (अ) सविता खंडेराव कानडी, 6 (अ)- लक्ष्मी राजू पवार (978), 6 (ब)- मनोज प्रतापराव देशमुख (803), 7 (अ)- सागर राजेंद्र कोथमिरे (1007), 7 (ब)- अंबिका लोकेश धनगर (950), 8 (अ)- संध्या शाम कासार (1435), 11(अ)- कमळाबाई भास्कर पगार (1125), 11 (ब)- शुभम भास्कर वारुंगसे (1074), 12 (ब)- निशा संजय बोडके (1176), 13 (अ)- अमोल अशोक झगडे (1132), 14 (अ)- पंकज अशोक मोरे (1741), 14 (ब)- ज्योती पंकज मोरे (1534) यांचा समावेश आहे. येथे याआधीच उदय प्रभाकर गोळेसर बिनविरोध झाले आहेत.
ओझर येथे प्रभाग क्रमांक 1 (अ) मध्ये जय संतोष जाधव (315), 7 (अ) मध्ये सुनील साहेबराव कदम (921), 7 (ब) मध्ये माया सुरेश काळे (1293), 8 (ब) मधून रोहित निवृत्ती लभडे (1157), प्रभाग 12 (अ) मधून दिपाली रवींद्र शिंदे (1181), प्रभाग 13 (क) मधून वृषाल दिलीप पगार (1143) निवडून आले आहेत.
भगूर येथील शिवसेनेचे शहरप्रमुख काकासाहेब जनार्दन देशमुख हे प्रभाग क्रमांक 4 (ब)मधून 325 मतांसह, तर त्यांच्या पत्नी जयश्री काकासाहेब देशमुख 3 (अ)मधून 668 मतांसह विजयी झाल्या आहेत. चांदवडला 6 (ब) प्रभागातून शिवसेनेच्या राजश्री प्रसाद प्रजापत 493 मतांनी निवडून आल्या आहेत.
मनमाड येथे प्रभाग 9 (अ) मधून सुजाता प्रवीण नाईक 1721 मते मिळवून विजयी झाल्या. प्रभाग 13 (ब) मधून अमोल दिलीप नरवडे यांनी 1175 मतांसह विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक 16 (क) मधून रेखा संजय कटारे (1257), 16 (ब) मधून दीपक वाल्मिक दराडे (1115) मते मिळवून निवडून आले आहेत.
चिठ्ठीद्वारे लक्ष्मी पवार विजयी
सिन्नरच्या प्रभाग क्रमांक सहामध्ये शिवसेनेच्या लक्ष्मी पवार आणि अजित पवार गटाच्या दिपाली बेंडकुळे यांना सारखी 978 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत नाईक यांनी चिठ्ठीद्वारे निकाल घोषित करण्याचा निर्णय घेतला. चिठ्ठीत शिवसेनेच्या पवार यांचे नाव आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.


























































