
आमीर खानचा बहुचर्तित ‘सितारे जमीन पर’ हा हिंदी चित्रपट यूट्यूब किंवा ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होण्याची चर्चा आहे. मात्र या सगळ्या अफवा असून हा चित्रपट फक्त चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार असल्याचे आमीर खानने स्पष्ट केले. तसेच सध्याच्या काळात प्रेक्षक फक्त अॅक्शन आणि हेवी कंटेंटमध्येच रस घेतात, असेही आमीर म्हणाला. आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित ‘सितारे जमीन पर’ हा हिंदी चित्रपट 20 जूनपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर हे 10 उदयोन्मुख तारे झळकत आहेत, तर प्रसिद्ध अभिनेता आमीर खान आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत आहेत.