
बिहारमध्ये सीता मातेची एक अष्टधातूची मुर्ती चोरली गेली आहे. ही मुर्ती दीडशे वर्ष जुनी असून आंतरराष्ट्रीय बाजारात या मुर्तीची किंमत काही कोटींच्या घरात आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
बिहारच्या मुजफ्फरपुरमध्ये एक राम सीतीचे दीडशे वर्ष जुनं मंदिर आहे. या मंदिरात राम सीतेची पाषाण आणि सीता मातेची एक अष्टधातूची मुर्ती होती. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुजारी मंदिरात आले तेव्हा त्यांना मंदिराच्या दरवाजाचे टाळे तोडलेले दिसले. मंदिरातील पाषाण मुर्ती बाहेर फेकली होती तर सीता मातेची मुर्ती चोरीला गेल्याचे त्यांना कळाले.
नंतर गावकर्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. पोलिसांनी श्वान पथक घेऊन तपास सुरू केला आहे. ही सीता मातेची ही मुर्ती दीडशे वर्ष जुनी होती. ही मुर्ती दहा किलोची असून या मुर्तीची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.



























































