
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत 1.27 लाख जागांसाठी तब्बल 6.21 लाख अर्ज आल्याची माहिती केंद्र सरकारने आज दिली. 2024 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा झाली होती. पाच वर्षांसाठी बडय़ा 500 कंपन्यांमध्ये तब्बल 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. 3 ऑक्टोबर रोजी ही योजना सुरू झाली.

























































