सहा पाकिटमार महिलांना अटक,किनगावराजा पोलिसांची कारवाई

55

सामना प्रतिनिधी । किनगावराजा

गर्दीचा फायदा घेऊन पाकिटमारी करणार्‍या सहा संशयीत महिला किनगावराजा पोलिसांच्या सतर्कतेमुळे गजाआड झाल्या. आरोपी महिलांविरुद्ध कलम 109 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

किनगावराजा येथे 30 जुलै रोजी संत गजानन महाराजांची पालखी येणार असल्याने खबरदारी म्हणून परिसरात गस्त घालत असतांना सोमवारी ठाणेदार जनार्धन शेवाळे व त्यांच्या कर्मचार्‍यांना किनगावराजा बसस्थानकावर सहा महिला संशयितपणे अढळून आल्या. यावेळी ठाणेदार शेवाळे यांनी नाव-गाव पत्ता याची विचारपूस केल्यास त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांच्यावर अधिकच संशय बळावला गेल्याने त्यांना येथील पोलीस ठाणा येथे आणून सविस्तर चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे सुनीता रमेश मसणजोगी, मेघना रमेश मसणजोगी, आशा विश्वास मसणजोगी, मेलना प्रवीण मसणजोगी, रेणुका रवी मसणजोगी (सर्व रा. बिडकीन जिल्हा संभाजीनगर) असे सांगितले. संत गजानन महाराजांची पालखी किनगावराजा पोलीस ठाणा हद्दीमध्ये येत असल्याने प्रतीबंधात्म्म्क कारवाई म्हनून या सहाही संशयित माहिलांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये कलम 109 कारवाई करण्यात आली आहे.

संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात भाविकांची गर्दी होत असल्याने भाविक भक्त जनतेने अशा माहिलांपासून सावध रहावे व पालखीमध्ये दर्शन घेताना अंगावर मौल्यवान वस्तू बाळगू नये तसेच संशयीत व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन ठाणेदार शेवाळे यांनी केले. सदर संशयित माहिलांपैकी आशा विश्वास मसणजोगी व भवानी मसणजोगी या दोघीजणींना याच महिन्यात 10 हजार रुपये चोरी करतांना रंगेहात पकडुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती अशी माहिती ठाणेदार जनार्धन शेवाळे यांनी यावेळी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या