संभाजीनगरात सारीचे सहा रुग्ण वाढले, रुग्णांची संख्या 25 वर

संभाजीनगर शहरात कोरोना पाठोपाठ सारीच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.  खासगी रुग्णालयात आणखी सहा रुग्ण आढळून आल्याने हा आकडा 25 वर पोहचला असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिका-यांनी दिली.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रुग्णांची तपासणी करताना सारीचे रुग्ण आढळून येत आहेत.  चार दिवसापूर्वी सारीच्या आजाराने एका बालकाचे निधन होऊन चार जणांना लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पुन्हा तीन रुग्ण आढळून आले. हे सर्व रुग्ण खासगी रुग्णालयातील होते. या रुग्णांचे नमुने प्रयोग शाळेत पाठवले असता यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे आढळून आले. त्यानंतर घाटी रुग्णालयात सारीचे बारा रुग्ण असल्याचे समोर आले. त्यापाठोपाठ खासगी रुग्णालयात आणखी सहा रुग्ण सारीचे आढळून आल्याने हा आकडा 25 वर गेला आहे. त्यामूळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. खासगी रुग्णालयातील 14 रुग्णांपैकी सात रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे मनपाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या