पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी सहा हजार कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुरंदर विमानतळाच्या विकासाला चालना मिळावी यासाठी आवश्यक भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली. पुरंदर विमानतळाच्या विकासासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. परिसरातील सुमारे 96 टक्के शेतकऱयांची विमानतळासाठी संमतीपत्रे मिळाली आहेत. त्यानुसार आता मोठय़ा प्रमाणात भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी उभा करण्यासाठी विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. असे कर्ज उपलब्ध करून घेण्यासही मान्यता देण्यात आली. तसेच या कर्जास शासन हमी देण्यास ही मंजुरी देण्यात आली.