पारदर्शक बिकिनी घालून बीचवर फिरणाऱ्या महिलेला अटक, फोटो झाले व्हायरल

33734

समुद्रावर पोहण्यासाठी बिकिनी घालणं ही काही नवीन बाब राहिलेली नाही. पण, एका महिलेला बिकिनी घालून बीचवर फिरण्यासाठी अटक करण्यात आली आहे. या घटनेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ही घटना फिलीपाईन्स इथल्या बोराके बेटाच्या पुका या समुद्र किनाऱ्यावर घडली. 26 वर्षांची लिन जू तिंग नावाची तरुणी तिच्या प्रियकरासोबत फिलीपाईन्समध्ये फिरायला आली होती. तिने पुका बीचवर फिरण्यासाठी जी बिकिनी घातली होती ती आखुड आणि पारदर्शक होती. दोन वेळा ती पुका बीचवर त्या बिकिनीत फिरली. त्यावेळी स्थानिकांनी तिचे फोटो काढले आणि ते फोटो व्हायरल झाले.

फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. तिला आता 3400 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जोपर्यंत ती दंड भरत नाही तोपर्यंत तिची सुटका करण्यात येणार नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. लिनने परिधान केलेल्या बिकिनीमुळे लोकांनी तिचे फोटो काढून व्हायरल केले. अशा प्रकारचे कपडे परिधान करणं हे आमच्या पारंपरिक संस्कृतीत बसत नाही, असं स्पष्टीकरण पोलिसांतर्फे देण्यात आलं आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या