स्कोडा फॉक्सवॅगनने हिंदुस्थान बनावटीच्या 5 लाख कार केल्या निर्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे लॉकडाऊमुळे अनेक क्षेत्राला फटका बसल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे वाहन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी स्कोडा अॅटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने कार निर्मितीत उल्लेखनीय कामगिरी बजाविली आहे. कंपनीने हिंदुस्थानी बनावटीचा 5 लाख गाड्या निर्यात करण्याचा महत्वपूर्ण टप्पा नुकताच पूर्ण केला आहे. कंपनीने या आर्थिक वर्षात तब्बल 25 हजारहून अधिक गाड्या निर्यात केल्या आहेत. कंपनीने नुकतेच मुंबई बंदरातून 982 गाड्या मॉक्सिकोला रवाना केल्या असून त्यात फॉक्सवॅगन ’वेन्टो’ या लेफ्ट हॅण्ड ड्राईव्ह कारचा समावेश आहे. या निर्यातीबरोबरच कंपनीने 5 लाख कार निर्यात करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. कंपनीने आतापर्यंत दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका, आफ्रिका यासारख्या एकूण 61 देशांमध्ये या हिंदुस्थानी बनावटीच्या कार निर्यात केल्या आहेत. कंपनीच्या या कामगिरीबद्दल बोलताना कार्यकारी अधिकारी गुरुप्रताप बोपाराई म्हणाले की, निर्यात ही आमच्या धोरणाचा अविभाज्य भाग आहे आणि पाच लाख युनिट्स मिळवणे हे कंपनीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे. जागतिकरित्या आणि हिंदुस्थानामध्ये स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन उत्पादन हे उच्च दर्जाचे उदाहरण म्हणून देता येईल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.