‘लावण्य दरबार’च्या यशानंतर ‘पाव्हणं जरा जपून’

मराठी रंगभूमीवर सध्या गाजत असलेल्या ‘लावण्य दरबार’ या कार्यक्रमाने अल्पावधीत 150 प्रयोगांचा टप्पा ओलांडला. ‘लावण्य दरबार’च्या तुफान यशानंतर ‘स्मित हरी प्रॉडक्शन’ने ‘पाव्हणं जरा जपून’ या नवीन लावणीप्रधान कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता आशुतोष गोखले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ गुढीपाडव्यानिमित्त करण्यात आला. श्री शिवाजी मंदिरचे विश्वस्त ज्ञानेश महाराव, बजरंग चव्हाण, मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, निनाद कर्पे यांच्यासह निर्माते स्मिता पाटणकर, लावण्यवती कविता घडशी, किरण पाटील यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाची संकल्पना हरी पाटणकर यांची असून संगीत प्रकाश सानप यांचे आहे. नृत्य दिग्दर्शनाची धुरा संदेश पाटील यांनी सांभाळली आहे.