सहजीवनी या : मला त्यांचा खूप अभिमान वाटतो

194

>> स्मिता थत्ते

l आपला जोडीदार – अनिल थत्ते.

l लग्नाचा वाढदिवस –  6 ऑक्टेबर.

l त्यांचे दोन शब्दांत कौतुक – त्यांच्यासारखे तेच.

l त्यांचा आवडता पदार्थ – घरी तयार केलेला ब्रेडवरचा पिझ्झा.

l एखादा त्यांच्याच हातचा पदार्थ – चीज ऑम्लेट

l वैतागतात तेव्हा – वैतागण्याची त्यांची डिग्री किती आहे त्यावर अवलंबून असतं.

l त्यांच्यातली कला – ते लेखक, कवी आहेतच. म्हणजे ते तसे ऑलराऊंडर आहेत. ते मुळात ललित लेखक आहेत. पूर्वी ते खूप कथा, कविता लिहीत असत. सगळ्या मासिकांमधून त्यांच्या कथा येत असत. हल्लीच्या लोकांना ते माहीत नाही. हल्ली त्यांना पत्रकार म्हणून जास्त ओळखतात.

l त्यांची गंमत करायची असल्यास – त्यांना त्यांच्या नातीचे कौतुक बघण्याची आणि ऐकण्याची जास्त आवड असते. ते असे कुठेतरी बसलेले असतील आणि मी फोनवर नात ओवीशी बोलतेय असा अभिनय करते. त्यांना असे वाटले की, ओवी फोनवर आली, तर ते हातातले काम सोडून धावत येतात आणि नंतर त्यांना गंमत केल्याचे कळते.

l त्यांच्यासाठी एखादी गाण्याची ओळ – तू जहां जहां रहेगा, मेरा साया साथ होगा…

l तुमच्या आयुष्यात त्यांचे स्थान – अद्वितीय.

l भूतकाळात जगायचे असल्यास कोणते दिवस जगाल? – आम्ही दोघेजण आमच्या मुलीच्या घरी अमेरिकेला गेलो होतो ते दिवस.

l तुमच्यातील सारखेपणा – मुलांवर असलेले प्रेम.

l तुम्हाला जोडणारा भावबंध – मुलं आणि नात.

l  कठीण प्रसंगात त्यांची साथ – कायमच असते. त्यांची मला आणि माझी त्यांना.

l आठवणीतला क्षण – आमची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली होती. ते प्राध्यापक होते आणि मी विद्यार्थिनी होते. महाविद्यालयात मला वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घ्यायचा होता. त्यासाठी मी त्यांना भेटायला गेले होते. तो क्षण विसरता येणार नाही.

l विश्वास म्हणजे – एकमेकांवर असलेले प्रेम.

l आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट – ते नेहमीच नवीन, वेगळं, कौतुकास्पदच करत असतात. त्या त्या वेळेला आम्ही त्यांना वा, अरे वा छान असे म्हणत त्यांना प्रोत्साहन देत असतो. हे सगळं ते मनस्वीपणाने करत असतात आणि जगत असतात. काहीवेळा सगळ्या गोष्टी आपण प्रेमाने सांगत असतो पण काही गोष्टी शब्दाने नाही सांगता येत. आम्ही एकमेकांवर प्रेम असल्याचे बर्‍याचदा सांगतो. त्यांचे वेळोवेळी कौतुक करते. पण ते जसं आनंदी आयुष्य जगता त्याचा खूप अभिमान आहे, आनंद आहे. हे शब्दात त्यांना कधी सांगता आले नाही.  

आपला जोडीदार… त्याची अनेक वर्षांची मोलाची साथ. अनेक गोड, तिखट आठवणींना उजाळा देणारं… आणि पती-पत्नी या नात्यातील भावबंध दृढ करणारं सदर… आपणही आपल्या जगण्यातील मान्यवरच असतो. तेव्हा जोडीदाराविषयीच्या नाजूक भावना मांडा छायाचित्रासहित या सदरामध्ये… या प्रश्नांच्या चौकटीत… सुंदर, तरल भावनांना प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : आनंदाचं झाड, शेवटचे पान, दै. ‘सामना’, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] वरही पाठवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या