उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी; केदारनाथ मंदिर बर्फाने झाकले

850

उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. या बर्फवृष्टीमुळे केदारनाथ मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात बर्फ साचले आहे. नुकत्याच झालेल्या मोठ्या हिमवृष्टीमुळे केदारनाथ मंदिराच्या अर्ध्या भागापर्यंत बर्फ साचले आहे. या हिमवृष्टीमुळे औली, मुक्तेश्वरसह उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी आलेले अनेकजण अडकून पडले आहेत.

उत्तराखंड मोठ्या प्रमाणात झालेल्या हिमवृष्टीने केदारनाथ मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात बर्फ साचले आहे. मंदिराजवळ 2 फूटांपेक्षा जास्त बर्फ साचले आहे. त्यामुळे अर्धे मंदिर बर्फाने झाकले गेले आहे. या हिमवृष्टीमुळे मंदिराच्या परिसरात सुरू असलेली विविध कामे थांबवण्यात आली आहेत. मंदिराचे दरवाजे हिवाळ्यामुळे बंद करण्यात आले आहेत. या काळात भाविकांना मंदिरात प्रवेशास मनाई असते. चमोली जिल्ह्यातील औलीसह इतर पर्यटनस्थळी रस्त्यांवर बर्फाची चादर पसरल्याचे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पर्य़टक अडकून पडले आहेत. हिमवृष्टीमुळे शुक्रवारपासून रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे. जोशीमठ भागात पाच इंचापर्यंत बर्फ साचले आहे. त्यामुळे जोशीमठ आणि औलीला जोडणारा रस्ता बंद आहे. मोठ्या बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आल्याने प्रशासनाने अनेक वाहने रस्त्यातच थांबवली आहेत. नैनीतालमध्येही शुक्रवारी हंगामातील पहिली हिमवृष्टी झाली आहे. उत्तराखंडमध्ये झालेल्या या हिमवृष्टीने उत्तर हिंदुस्थानातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या