तुम्हालाही ‘सोन पापडी’ आली का? मीम्समुळे ट्रेंडमध्ये आली मिठाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
soan papdi

दिवाळी (Diwali) च्या निमित्ताने एकमेकांना फराळ, मिठाई वैगरे दिले जाते. सध्या तयार मिठाई देण्याचं प्रमाण वाढलं आहे. यासगळ्यात सहज उपलब्ध होणारी आणि जास्त काळ टिकणारी मिठाई म्हणजे ‘सोन पापडी’. अनेकजण सोन पापडी एकमेकांना देतात. मात्र या सोन पापडीची एक वेगळी कहाणी आहे. सोन पापडीचे पॅकेट अनेकदा एकाकडून दुसऱ्याकडे पास होत राहतात. कधी तर सोन पापडीचं पॅकेट फिरून पुन्हा त्याच व्यक्ती येतं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सोन पापडीचे मीम्स शेअर होत आहे. #Sonapapdi हा हॅश टॅग ट्रेंडिंगमध्ये आहे.

स्विगी सारख्या कंपन्यांनी देखील मीम्स शेअर केले आहेत. स्विगीच्या ट्विट मध्ये म्हटलं आहे, ‘आई नेहमी सांगते की, जीवन सोन पापडीच्या बॉक्स सारखं आहे. तुम्ही जे देतात तेच तुम्हाला मिळतं.’

खुद्द ट्विटर इंडियाच्या हँडलवरून देखील ‘एकदाचं ठरवून टाकू, काजू कतली की सोन पापडी?’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यामुळे मीम्सची लाट आली आहे.

Tinder India ने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘अशा व्यक्तीला डेट करा जो तुम्हाला सोन पापडी सारखं नाही तर काजू कतली सारखं वागवेल.’

दिवाळीच्या काळात सोन पापडी मिठाई घराघरात वाटली जाते. मात्र लोकांचा अनुभव असा आहे की, ‘सोन पापडी फक्त वाटली जाते, खाल्ली जात नाही.’