
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष 23 जानेवारीपासून सुरू झाले आहे. त्यानिमित्त शिवसेनेसह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने मुंबईसह राज्यभरात रक्तदान शिबीर, वैद्यकीय शिबीर, रुग्णांना फळवाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळ आणि शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने पोईबावडी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊवाटप नगरसेविका उर्मिला पांचाळ, उपविभागप्रमुख पराग चव्हाण, ग्राहक संरक्षण कक्षाचे सुशीलकुमार सुंकी यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थापक आनंद गांवकर, शिवसेना सचिव सुधीर साळवी, आमदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास अध्यक्ष संतोष कांबळी, नाना फाटक, प्रभाकर मोरजकर, रवींद्र ओटवकर, दिनेश लोखंडे, प्रफुल्ल गांवकर, प्रकाश जाधव, नीलाक्षी चेंदवणकर, सुवर्णा गुराम उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. 206च्या वतीने शिवडी नाका येथे लाडू वाटप करण्यात आले. आमदार अजय चौधरी, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे, शाखा संघटक शुभदा पाटील, शाखा समन्वयक भारती देवाडिगा आदी या वेळी उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. 131 च्या वतीने शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अजित गुजर, विजय चपटे, विशाल चावक, प्रदीप सावंत, दिलीप ताटे, शांताराम निकम, कैलास गोसावी, नीलम कदम, रमेश सावंत, बटुक कमानी, उदय पाटील, लौकेश फेपडे, मनोज पोटावडे आदी उपस्थित होते.
































































