
सर्वोच्च न्यायालयाने एका 23 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची बलात्काराच्या आरोपातून मुक्तता केली. महिलेने तरुणावर लावलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. तक्रारदार महिलेला नोटीस पाठवूनही ती सुनावणीला उपस्थित राहिली नाही. याआधी आरोपीला अंतरिम जामीन देण्यात आला होता. 9 महिने कारावासाची शिक्षा भोगल्यानंतरही त्याच्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यात आले नाहीत, असे कोर्टाने नमूद केले.