सोशल मीडियावर असाल तर ‘या’कडे दुर्लक्ष करू नका, महाराष्ट्र सायबर विभागाने दिला इशारा

1205

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल गेट्स, जेफ बेझो, उबेर व अँपल कंपन्यांची ट्विटर अकाउंट्स हॅक केली आहेत गेली आहेत. तसेच वरील व्यक्तींच्या नावाचे ट्विट पाठवून काही ठराविक रक्कम इनाम म्हणून पण जाहीर करण्यात आली आहे. तसेच हॅक झालेल्या अकाउंट्स वरून काही फेक लिंक्स पण टाकण्यात आल्या होत्या ज्या अन्वये सायबर भामट्यांच्या खात्यात साधारणपणे 1.2 लाख डॉलर किमतीच्या बिटकॉईन्स जमा करून झाल्याचा अंदाज आहे. अशा बातम्या सर्व समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सायबर पोलीस सतर्क झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मागोवा घेऊन महाराष्ट्र सायबरने या संदर्भात ट्विटर इंडियाला लगेच सूचना दिल्या आहेत. सर्व नागरिकांच्या, महत्वाच्या व्यक्तींचे व संस्थांचे अधिकृत ट्विटर अकाउंट्स व त्या अकाउंट मधील सर्व डेटा व त्या अकाऊंटची प्रायव्हसीची काळजी घ्यावी व त्याकरिता त्यांनी आवश्यक ते तांत्रिक बदल आपल्या सायबर सुरक्षा प्रणालीमध्ये करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. कोरोना महामारीच्या काळात आधीच तणावपूर्ण वातावरण असताना असे काही प्रकार घडू नयेत. जर कोणत्याही अकाउंटवरून काही चुकीची माहिती प्रसारित झाली तर त्यामुळे राज्यात गोंधळ पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 79(3)( ब) अन्व्ये सदर सर्व ट्विटर अकाउंट्सच्या सुरक्षिततेची जवाबदारी ट्विटर इंडियाची आहे. तसेच अशाच प्रकारच्या माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 79(3)(बी) अन्वये नोटीस महाराष्ट्र सायबरने अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Facebook, whatsapp, instagaram etc) ना पण पाठवून त्यांना ही सर्व नागरिकांच्या प्रोफाईल व डेटा व खासगी माहितीची सुरक्षा राखण्याबाबत सांगितले आहे.

नागरिकांना आवाहन

1) कृपया आपल्या ट्विटर व अन्य सोशल मीडिया अकाउंट्सचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहा.

2) ट्विटर येणाऱ्या व कोणत्याही सेलिब्रिटी किंवा blue tick verified अकाउंटने एखादी बातमी ट्विट केली तर आंधळेपणाने ती retweet करू नका आधी सदर बातमीची खातरजमा करून घ्या.

3) कोणत्याही सेलिब्रिटी किंवा blue tick verified अकाउंटवरून जर काही मेसेज किंवा काही पैसे मिळतील अशा संदर्भात कोणती scheme किंवा offer आली तर त्यावर विश्वास ठेवून क्लिक करू नका.

आपली प्रतिक्रिया द्या