सोशल मीडिया प्रोफाइल्स आधारशी जोडणार नाही

336

सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या युजर्सचे प्रोफाइल्स आधारकार्ड क्रमांकाशी जोडण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारपुढे नाही, अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी लोकसभेत दिली.

गौरव गोगोई, सुनील मेढे यांच्यासह आणखी काही खासदारांनी विचारलेल्या प्रश्नोत्तराच्या तासाला दिलेल्या उत्तरात रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, सोशल मीडियाच्या दुरुपयोगावर अंकुश ठेवण्यासाठी आणखीही बरेच उपाय आहेत. सोशल मीडियाद्वारे पोर्नोग्राफी पसरविली जाते हे खरे. ही एक खूप गंभीर समस्या आहे, पण आपल्या देशात रिव्हेंज पोर्न हा ट्रेण्डही खूप जोमात वाढत आहे, असेही प्रसाद यांनी पुढे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या