
शुभांगी बागडे << [email protected] >>
मौखिक परंपरा हे बोलींचे महत्त्वपूर्ण वैशिष्टय़. बोली म्हणजे खरे तर लोकभाषाच. मौखिक परंपरेने या एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे संक्रमित होत असतात. अशी बोली विकसित होण्याची क्रिया अनेक वर्षांची असते. म्हणूनच कोणत्याही सामाजिक प्रश्नाचे उत्तर शोधताना बोलींचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. विशेषतः लोकसमूहाचे सामाजिक, सांस्कृतिक वर्तन, आणि त्याची संरचना याचे निदर्शक बोलीभाषा असते हे नाकारता येणार नाही.
21 फेब्रुवारी हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. भाषिक विविधता हा आदिम काळानंतरच्या विकासातील महत्त्वाचा मानवी विकास असं म्हणायला हरकत नाही, इतकं वैविध्य आपण जपत आहोत. आपल्या मातृभाषेसोबत आपण समृद्ध होत जातो आणि मातृभाषेवर निस्सीम प्रेम करत आपण ज्ञानव्यवहारासाठी इतरही भाषा शिकतो, परंतु आपली विचारांची, व्यक्त होण्याची भाषा मातृभाषाच राहते.
भाषिक विविधतचे विश्वसंस्कृतीतील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी युनेस्कोने आंतरराष्ट्रीय मायबोली दिन साजरा करण्याचा ठराव केला व त्यानुसार सन 2000 पासून 21 फेब्रुवारी हा दिवस जगात सर्वत्र आंतरराष्ट्रीय ‘मायबोली दिन’ म्हणून साजरा केला जातो. यामागे घडलेली घटनाही तितकीच संवेदनशील होती. पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल महंमद अली जीनांनी 21 फेब्रुवारी 1948 रोजी, ‘यापुढे पाकिस्तानात (पूर्व पाकिस्तान, आता बांगलादेश धरून) उर्दू ही एकमेव अधिकृत भाषा असेल,’ असा आदेश काढला. मात्र त्या वेळी बांगलादेशातील बहुसंख्यांची भाषा बंगालीच होती. या वेळी याचा निषेध करत ढाक्याच्या विद्यार्थ्यांनी 21 फेब्रुकारी 1952 रोजी सत्याग्रह केला. हा शांततापूर्ण सत्याग्रह चिरडण्याकरिता केल्या गेलेल्या गोळीबारात चार विद्यार्थ्यांचे जीव गेले. या प्रसंगाच्या स्मृत्यर्थ दरवर्षी 21 फेब्रुवारी ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ म्हणून साजरा केला जावा, असं 1999 मध्ये युनेस्कोनं अधिकृतपणे घोषित केलं आणि 2000 पासून हा दिवस जगभर साजरा होऊ लागला. पुढे 2007 पासून प्रत्येक वर्षासाठी विशेष संकल्पना मांडली जाऊ लागली. या वर्षी बहुभाषिक शिक्षण – शिक्षणात परिवर्तनाची गरज ही संकल्पना मांडण्यात आली आहे. यात बदलत्या जागतिक संदर्भात बहुभाषिक शिक्षण महत्त्वाचे असून शिक्षणासाठी केवळ एकाच भाषेचा वापर पुरेसा नाही हे मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिक्षणासाठी स्थानिक भाषा, अल्पभाषिक गटाच्या भाषा आणि मातृभाषेचा अंतर्भाव असावा याबाबत जागरुकता निर्माण करून लुप्त होत चाललेल्या किंवा नामशेष होण्याचा धोका असलेल्या भाषांना पुनरुज्जीवित करण्यासाठी नवीन प्रयोग करण्याबाबत आग्रही भूमिका मांडणार आहे.
स्थानिक भाषा किंवा मातृभाषा याबाबत जागरुकता निर्माण करतानाच लुप्त वा नामशेष होण्याचा धोका असलेल्या भाषांचं महत्त्वच अधोरेखित केले आहे. आजघडीला भारतातील अनेक बोलीभाषांना असणारा धोका यातून स्पष्ट होतो. याबाबत काही वर्षांपूर्वी घडलेली घटना फार बोलकी आहे. अंदमान बेटाकर ठराकीक आदिकासी भाषा बोलणारे समूह काळाच्या ओघात नामशेष झाले. अशाच एका समूहातील शेवटची व्यक्ती ठरलेल्या कृद्ध स्त्राrच्या मृत्यूबरोबर ती भाषाही लोप पाकली आणि मानकी संस्कृतीचे एक दालन कायमचे बंद झाले. भाषेचा अल्प वापर अथवा वापरच नसणे यामुळेही जगातील कितीतरी भाषा मरणपंथाला लागलेल्या आहेत. याचे महत्त्काचे कारण म्हणजे, या भाषा बोलणाऱया लोकांची संख्या झपाटय़ाने कमी होऊ लागली आहे.
मातृभाषेचे जतन, संवर्धन करताना बोलीभाषेला दूर ठेवता येत नाही, कारण आपली मायबोली आणि प्रमाण भाषा अशा अनेक बोलीभाषांमधून आकारास आलेली असते. दर वेशीगणिक बोली बदलते असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या राज्यात किती बोलीभाषा असतील याची कल्पना येते.
बोली या शेकडो वर्षांच्या प्रवासातून व रोजच्या व्यवहारातून विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे बोली या तिथल्या समाजाची आणि प्रदेशाची अभिव्यक्ती असतात. जगभरातील भाषेचे अभ्यासक म्हणतात की, बोली टिकल्या तर भाषा टिकतील. भाषा टिकल्या तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर समाज आणि त्याची मूल्यव्यवस्था टिकून राहील.
सध्या भारतात अशा असंख्य बोली आहेत, तर इंग्रजीसह 23 प्रमाण भाषांचा वापर केला जात आहे. लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया (1903-1923) नुसार भारतात 179 भाषा आणि 544 बोली होत्या. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. भाषा धोक्यात असलेल्या देशांत भारताचा क्रमांक वरचा असून 198 भाषा मरणपंथाला लागल्याचा धोका युनेस्कोने दिला आहे. बोलींचे प्रदेशवार, जिल्हावार, प्रांतवार ते अगदी त्या त्या समाजानुसारही बोलींमध्ये भेद आढळून येतात. अहिराणी, वऱहाडी, पोवारी, नागपुरी, कोकणी, ठाकरी, वारली, सामवेदी, नगरी, कोल्हापुरी, चित्पावनी, चंदगडी… अशा एकंदर मराठी बोलींची संख्या 100 हून अधिक असावी.
स्वतŠची भाषा वा बोली नसलेला एकही मानवी समूह अस्तित्वात नाही. विशिष्ट भाषा अवगत होण्यासाठी सामाजिक संदर्भ व संपर्क अपरिहार्य असतो. सामाजिक संबंध निर्माण करण्यासाठी, राखण्यासाठी, वाढवण्यासाठी बोली महत्त्वाची ठरते. कोणत्याही भाषेत व्यक्तिगत बोली, सामूहिक बोली, प्रादेशिक बोली असे प्रकार आकारास येत असतात. यामुळे तयार होणारे प्रादेशिक स्वरूप त्या त्या भागाचे सामाजिक व सांस्कृतिक संचित असते, जे बोलीभाषांमुळे जतन होत असते. प्रत्येक बोली बोलणाऱया समाजाची स्वतŠची एक संस्कृती असते, जी इतर बोलीभाषक समाजाशी काही बाबतीत साम्य तर कधी भिन्नता दर्शवते. म्हणूनच समाजाचे संक्रमण अभ्यासताना जवळच्या बोली आणि भाषा यांचा परस्परसंबंध अभ्यासला जातो. प्रमाण भाषा आणि बोलीबाबत महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वमान्य मराठी भाषा स्वीकारार्ह ठरली आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे, बोली ही खऱया अर्थाने आपली मातृभाषा आहे तर शालेय जीवनापासून शिकवली जाणारी प्रमाण भाषा ही शिक्षणाची भाषा आहे.
प्रमाण भाषा, बोलीभाषा, समाजभाषा, लोकभाषा यामुळे सामाजिक आदानप्रदानाची क्रिया घडते. बोली ही प्रमाणभाषेच्या आधी उदयाला आलेली त्या त्या समूहाची लोकसंवादी भाषा असते. म्हणूनच सामाजिक एकात्मतेच्या दृष्टीने बोली महत्त्वपूर्ण ठरतात. बोली आणि समाज यांचा स्वतंत्रपणे विचार केला जाऊ शकत नाही. तसेच भाषा ही संवादी भाषाच असते, ती शुद्ध अशुद्ध असूच शकत नाही. म्हणूनच सर्वांना एकत्र आणणारे माध्यम प्रवाही व्हावे यासाठी प्रमाण भाषेसोबतच बोलीभाषेचीही प्रतिष्ठा उंचावली पाहिजे.





























































