मोज्याला दुर्गंधी येतेय? मग हे घरगुती उपाय करून पाहाच…

2285
प्रातिनिधिक फोटो

बराच काळ मोजे वापरल्याने त्याला घाण वास (दुर्गंधी) यायला लागतो. कधी कधी नवीन मोज्यांनाही असा वास येतो. अनेकदा धुळ आणि घाणीच्या संपर्कामध्ये आल्याने मोजे काळसर होतात आणि त्यामधून दुर्गंधी येण्याचा प्रकार घडतो. परंतु काही घरगुती उपायांनी मोज्यातील दुर्गंधी तुम्ही दूर करू शकता.

socks-smell-remover-tips1

1. एक लीटर पाण्यामध्ये (पाणी जास्त गरम नको) 2 चमचे मीठ टाका आणि मोजे भिजवत ठेवा. मोजे काळसर झाले असतील तर त्यात डिटर्जंट पावडरही घालू शकता. या उपायाने मोज्याची दुर्गंधी दूर होईल.

socks-smell-remover-tips3

2. पांढऱ्या मोज्यांना धुण्यासाठी हायड्रोजन परऑक्साइडचा वापर करू शकता. यामुळे मोजे साफ तर होतातच शिवाय दुर्गंधीही दूर करतात.

socks-smell-remover-tips2

3. एक लीटर कोमट पाण्यात चतुर्थांश कप हायड्रोजन परऑक्साइड मिसळून त्यात काही वेळासाठी मोजे भिजवत ठेवा. यानंतर ते मोजे डिटरजन्टने धुवून काढा.

socks-smell-remover-tips5

4. बेकिंग सोडाही मोज्यातील दुर्गंधी दूर करू शकतो. पाण्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळून त्यात मोजे भिजवत घाला. मोज्यावरील काळे डाग निघून जातात.

socks-smell-remover-tips4

5. लिंबात अॅसिड असते जे मोज्यातील दुर्गंध दूर करते. एक लीटर पाण्यात लिंबाचा रस घालून मोजे धूवा. यामुळे मोज्यातली दुर्गंधीही निघून जाईल.
(या लेखातील माहितीची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी चर्चा करावी)

आपली प्रतिक्रिया द्या