
>> डॉ. आदिनाथ ताकटे
आधुनिक शेतीमध्ये माती परीक्षणाचे महत्त्व अन्यन्यसाधारण झालेले आहे. माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थि केल्याने खतांच्या मात्रेत बचत तर होतेच त्याचबरोबर प्रमाणशीर खतांची मात्रा देता येते. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढविता येते. जमिनीचा खालावत चाललेला पोत हे आजच्या शेतीसमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे शेती टिकवायची असेल तर माती जिवंत राहिली पाहिजे. नुकताच 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. माती परीक्षणाद्वारे जमिनीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हाच यामागचा उद्देश आहे.
गेल्या 50 वर्षांत रासायनिक खतांचा आणि पाण्याचा अनिर्बंध वापर झाला. त्यामुळे लाखो हेक्टर जमीन नापीक झाली. रासायनिक खतांच्या वापरामुळे मोठा फायदा होतो असे प्रारंभी दिसले खरे, परंतु लहान मुलांची प्रकृती लक्षात न घेता खाद्यपदार्थाचा आणि विटामिन्सचा मारा केला तर त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडत जाते तसाच काहीसा प्रकार शेतजमिनीच्या बाबतीत झाला. जमीन सुधारण्याऐवजी, जादा उत्पादन मिळण्याऐवजी पिकाला आवश्यकतेपेक्षा जास्त खत दिल्यामुळे जमीन बिघडली. उत्पादन कमी येऊ लागले, त्याचबरोबर खरोखरच आवश्यक असलेल्या सेंद्रिय खतांकडे दुर्लक्ष झाले. पाटाचे पाणी परत केव्हा मिळेल याची खात्री नसल्यामुळे, मिळाले की पिकाला आवश्यक नसतानाही जड पाणी दिल्याने क्षाराचे प्रमाण वाढत गेले. त्या जमिनीत पीक येईनासे झाले. जमीन नापीक झाली, क्षारपड झाली. खते आणि पाणी यांच्या अधिकाधिक वापराने अधिकाधिक उत्पादन घेण्याची हाव नडली. अतिरेक अंगलट आला. हरितक्रांतीच्या यशाच्या नादात शेतजमिनीचे आजारपण फार उशिरा लक्षात आले. दोहनऐवजी जमिनीचे शोषण झाले. अशा निसत्व केलेल्या जमिनीतून येणारे पीकही सत्वहीन झाले. त्यावर जगणारे आपणही सत्वहीन झालो तर नवल कसले? देशाच्या लोकसंख्येत होणारी झपाटय़ाने वाढ, या वाढत्या लोकसंख्येचा शेती क्षेत्राकर पडणारा भार, वाढते शहरीकरण, उद्योग-व्यवसायाकरिता शेतजमिनीचा वापर यामुळे लागवड योग्य क्षेत्रात घट होत आहे. जागतिक हवामान बदलात होणारी गारपीट, थंडी, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ–उतार यामुळे मातीवर परिणाम होत आहे. अमर्याद सिंचन, रासायनिक खते, कीडनाशकाच्या अमर्याद वापराने माती प्रदूषित होत आहे. जमिनीची धूप होऊन सुपीक मातीचा थर वाहून जातोय. एकीकडे लागवड योग्य क्षेत्रात अनेक कारणांनी होत असलेली घट, जमिनीचा खालावत चाललेला पोत हे आजच्या शेतीसमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे शेती टिकवायची असेल तर माती जिवंत राहिली पाहिजे. संयुक्त राष्ट्र संघाने 2015 हे वर्ष ‘जागतिक मृदा वर्ष’ म्हणून घोषित केले होते. त्याचबरोबर 5 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून गेल्या पाच वर्षांपासून साजरा होत आहे. यामागील प्रमुख उद्देश जमिनीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यावरील उपाययोजना यासंदर्भात शेतकऱयांमध्ये जाणीव निर्माण करणे.
सद्यपरिस्थितीत मातीच्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने जमिनीच्या सुपिकतेवर आणि उत्पादकतेकर विपरीत परिणाम झाला आहे. दरवर्षी हेक्टरी 16 टन माती वाहून जात आहे. जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अत्यंत कमी (0.03 टक्क्यापर्यंत) झाले आहे. यामुळे मातीमध्ये विविध प्रकारच्या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. याचा विपरीत परिणाम मानवाच्या, जनावरांच्या आणि सुक्ष्मजीवांच्या आरोग्यावर होत आहे. जागतिक स्तरावर या बाबींची प्रकर्षाने नोंद घेतली गेली आहे. अन्नसुरक्षा आणि सुरक्षित अन्न या दोहोंमध्ये संतुलन साधण्याकरिता मातीचे आरोग्य जपावेच लागेल. याकरिता येणाऱया काळात मोठय़ा प्रमाणात सेंद्रिय पदार्थाचा वापर करावयास हवा. पीक उत्पादनाकरिता जमिनीची उत्पादन क्षमतेनुसार, काटेकोर आणि कार्यक्षम वापर होणे गरजेचे आहे. यासाठी माती आणि पाणी परीक्षण करून त्यानुसार रासायनिक खतांचा वापर व्हायला हवा. त्यासाठी प्रत्येक शेतकऱयाने आपल्या शेतजमिनीची आरोग्यपत्रिका तयार करून घेणे आवश्यक आहे.
वाढत्या लोकख्येसाठी पुरेशा अन्नधान्याचे उत्पादन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. अन्नधान्यही सवस असले पाहिजे. याबाबतीत स्वावलंबी होणे ही जरुरी आहे. त्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न होत आहेत. शासन ही सतर्क झाले आहे. जमिनीत काय कमी आहे हे आजमावत रासायनिक खतांचा आणि पाण्याचा मारा करण्यापूर्वी झालेली चूक परत होऊ नये म्हणून जमिनीची तपासणी करून सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा तपासणीमुळे जमिनीत काय कमी आहे आणि किती कमी आहे हे आजमावता येते आणि तेवढेच देण्याच्या प्रयत्न करता येतो.
शेती व्यवसायामध्ये सुपीक जमिनीस अत्यंत महत्त्व आहे. म्हणून शेतकऱयाने आपल्या जमिनीविषयीची सखोल माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. आपली जमीन कशी आहे, पाणी कसे आहे, त्यानुसार कोणते पीक घेतले पाहिजे. त्या पिकास कोणत्या अन्नद्रव्यांची केव्हा आणि किती प्रमाणात गरज आहे. जमिनीत किती प्रमाणात अन्नघटक उपलब्ध आहेत. भरपाई कोणत्या खतामधून भागवता येईल याचा विचार करताना जमिनीचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे याचाही विचार करणे आवश्यक आहे. यशस्वी शेतीचे रहस्य प्रामुख्याने जमिनीतून भरघोस पीक घेणे तसेच जमिनीची उत्पादन क्षमता कायम टिकवून ठेवणे हे आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱयाने आपल्या शेतजमिनीची आरोग्यपत्रिका तयार करून घेतली पाहिजे. पिकाचे अस्तित्क, मातीच्या आणि पाण्याच्या स्वाथ्यावरच अकलंबून असते. आपले आरोग्य दीर्घकाळ, निरोगी राहण्यासाठी नियमितपणे डॉक्टरांकडे सर्व चाचण्या करून त्याप्रमाणे शरीर सुदृढ ठेवतो तसेच नियमित माती, पाणी परीक्षण ही नियोजनबद्ध, किफायतशीर शेतीची गुरुकिल्ली आहे.आधुनिक शेतीमध्ये अधिक भांडवल गुंतवावे लागत असल्याने या ठिकाणी माती व पाणी परीक्षणाचे महत्त्क अन्यन्यसाधारण झालेले आहे. माती परीक्षणावर आधारित खत व्यावस्थापन केल्याने खतांच्या मात्रेत बचत तर होतेच त्याचबरोबर प्रमाणशीर खतांची मात्रा देता येते. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढविता येते. तसेच जमिनीचे आरोग्य चिरकाल टिकविण्यासाठीसुद्धा मदत होते.
जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मांचे संवर्धन करावे लागते. शाश्वत शेतीमध्ये पिकांचे फायदेशीर उत्पादन घेऊन सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर करून जमिनीची सुपिकता टिकविली जाते. ही जमिनीची सुपिकता आज मिळविण्यासाठी मातीची तपासणी करणे आवश्यक आहे.
(लेखक मृदा शास्त्र्ाज्ञ असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे प्राध्यापक आहेत.)





























































