उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी आवर्तन सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून १६०० क्युसेकने भीमा नदीपात्रात सोमवारी (दि. २३) सायंकाळी पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.

२०२२च्या पावसाळ्यात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली होती. त्यामुळे भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या १७ बंधार्‍यांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला होता. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या टाकळी व िंचचपूर बंधार्‍यातदेखील पुरेसा पाणीसाठा होऊन पुढे कर्नाटक हद्दीत पाणी वाहून जात होते; परंतु सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या टाकळी बंधार्‍यातील पाणी १३ ते १४ जानेवारीदरम्यान संपले होते. त्यामुळे िंचचपूर बंधार्‍यातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, या बंधार्‍यातही आठ ते दहा दिवसांचाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सोलापूर मनपा आयुक्तांनी जलसंपदा विभागाकडे पाणी मागणीचे पत्र पाठवले होते. त्यानुसार सोमवारी सायंकाळी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून १६००, तर धरणाच्या ८ दरवाजांमधून ४४०० असे एकूण ६००० क्युसेकने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याचे धरण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत माने यांनी सांगितले.

साडेपाच टीएमसी पाण्याचा वापर होणार

 उजनी धरण ते टाकळी बंधारा हे भीमा नदीतील प्रवाही अंतर २३२ किलोमीटर असून, आठ ते नऊ दिवसांत म्हणजेच १ फेब्रुवारीदरम्यान नदीप्रवाहातील पाणी टाकळी व नंतर चिंचपूर बंधार्‍यात पोहोचेल व सोलापूर शहरासाठी पुढील दोन ते अडीच महिने पाण्याची िंचता भासणार नाही. या आठ ते नऊ दिवसांमध्ये धरणातून एकूण पाच ते साडेपाच टीएमसी पाणी सोलापूर शहराला पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, भीमा नदीकाठावरील पाणीपुरवठा होणार्‍या पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आदी शहरांसहित नदीकाठावरील लहान-मोठी गावे, वाड्या-वस्त्या व पाणीपुरवठ्याच्या अनेक संस्थांनाही पाणी मिळणार आहे. विशेष म्हणजे नदीप्रवाहातील पाणी नियोजित वेळेत टाकळी बंधार्‍यापर्यंत पोहोचावे म्हणून नदीकाठावरून शेतीसाठी उचल पाणी घेणार्‍या विद्युत पंपांचे सर्व ट्रान्स्फॉर्मर्सचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

२३ जानेवारी रोजी उजनी धरणाची स्थिती

 पाणीपातळी – ४९६.७३० मीटर

 एकूण पाणीसाठा – ३२८६.५४ दशलक्ष घनमीटर (११६.०५ टीएमसी)

 उपयुक्त पाणीसाठा – १४८३.७३ दशलक्ष घनमीटर (५२.३९ टीएमसी)

 टक्केवारी – ९७.७९ टक्के

धरणातून होणारा विसर्ग

 दहिगाव िंसचन योजना – ४० क्युसेक

 सीना-माढा िंसचन योजना – ०० भीमा-सीना जोड कालवा (बोगदा) – ००

 मुख्य कालवा – २००० क्युसेक

 वीज निर्मिती केंद्र – १६०० क्युसेक

 आठ मुख्य दरवाजांतून – ४४०० क्युसेक