
जिह्याची आरोग्यसेवा सुधारावी, या हेतूने जिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीकर सुरू आहे. फेब्रुवारी अखेरीस इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यानंतर एका महिन्यात अंतर्गत कामे पूर्ण करून एप्रिल 2023 पासून जिल्हा रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.
शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील सर्वच खाटा रुग्णांनी भरलेल्या असतात. सोलापूरसह लातूर, धाराशिव, बीड, इंदापूर, कर्नाटक येथील रुग्ण सर्वोपचार (सिक्हिल) रुग्णालयात उपचारासाठी येतात. ग्रामीणमधील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची अवस्था असून नसल्यासारखीच आहे. त्या ठिकाणी मनुष्यबळ व उपचार यंत्रणा अपुरी आहे, त्यामुळे जिह्याला जिल्हा रुग्णालयाची गरज होती.
चार वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयाचे काम हाती घेण्यात आले होते. पण, कोरोनामुळे दोन वर्षे काम बंदच होते. आता पुन्हा कामाला गती प्राप्त झाली असून, बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निगराणीखाली बांधकाम सुरू असून, दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळे डॉक्टर्स, तंत्रज्ञ, नर्सेसची भरती केली जाणार आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच झाला आहे.
जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी फर्निचरचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) दोन कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱयांच्या माध्यमातून पालकमंत्री विखे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. तो निधी लवकर मिळाल्यास रुग्णालयाचा शुभारंभ काही महिन्यांत शक्य होणार आहे.
सोलापुरातील गुरुनानक चौकात जिल्हा रुग्णालय होत असून, 90 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. आता दीड महिन्यात अंतर्गत फर्निचरचे काम हाती घेतले जाईल. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागितला आहे. नवीन आर्थिक वर्षात या रुग्णालयातून रुग्णसेवा सुरू होईल, अशी माहिती सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितली.
महिला, बालक रुग्णांसाठी 100 खाटा
जिल्हा रुग्णालयात महिला व बालकांच्या प्रत्येक आजारावर मोफत उपचार होतील. शस्त्र्ाक्रिया, प्रसूती, सिझेरियन याचीदेखील सोय असेल. महिला व बालकांसाठी स्वतंत्रपणे 100 खाटा उपलब्ध असणार आहेत. दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटलच्या धर्ती वर त्या ठिकाणी 100 खाटा सर्वप्रकारच्या रुग्णांसाठी असणार आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियंत्रणाखाली त्याचे कामकाज पाहिले जाणार आहे.



























































