अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचा खून; आरोपीला अटक

1584

सोलापूरमधील तेलगाव येथे पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाचा चाकूने वार करून, दगडाने मारुन खून करण्यात आला आहे. युवराज लांडगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरसोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे राहणारे आरोपी रामहरी बनसोडे व मयत युवराज लांडगे हे दोघे शेजारी राहणारे आहेत. युवराजवर पत्नी बरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन वाद होता. यातूनच युवराजवर बुधवारी रात्री रामहरी बनसोडे याने दगडाने मारत चाकूने वार केला. यात तो जागीच ठार झाला. सोलापूरतालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रामहरी बनसोडे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसनिरीक्षक संजय जगताप करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या