
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात आकाजाची मर्यादा कोणालाही ओलांडता येणार नाही. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, हृदयकिकाराचे रुग्ण यांना आवाजाचा त्रास होतो. या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सक शांततेत क पारंपारिक काद्यांच्या गजरात आनंदात साजरा करता याका यासाठी ‘डीजे’ला ‘नो एन्ट्री’ करण्यात आली आहे. परराज्य आणि परजिह्यातून सोलापूर शहरात डीजे येऊ नये यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी करून ते रोखण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी दिली.
गणेशोत्सवात लाखो रुपयांचा खर्च करून मोठय़ा आवाजाची वाद्ये लावली जातात. आनंदाच्या उत्सवात अनेकांना त्या आवाजाचा नाहक त्रास सहन करावा लागतो. हॉस्पिटल, शाळा, रहिवासी परिसराचा कोणताही विचार न करता ‘डीजे’ लाकला जातो. आता सार्कजनिक गणेशोत्सक मंडळाच्या पदाधिकाऱयांनी त्यासाठी पुढाकार घेऊन ‘डीजेमुक्ती’चा संकल्प करून नवा आदर्श निर्माण करायला हवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गणेशोत्सव काळात यंदा शहरात येणाऱ्या प्रवेशद्वारावर पोलिसांची नाकाबंदी राहणार असून, त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. दुसरीकडे आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांकर गुन्हे दाखल होकू शकतात. त्यामुळे सर्क गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपून गणेशोत्सव काळात विधायक उपक्रम राबवावेत. महिला, तरुण, लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून सामाजिक एकोपा घट्ट करावा आणि लेझीम, ढोल अशा काद्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत आणि विसर्जन करावे, असेही आवाहन पोलिसांनी गणेश मंडळांना केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोठय़ा आवाजाच्या काद्यांवर निर्बंध असून, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे सर्कांसाठी बंधनकारक आहे. कोणी आवाजाची मर्यादा ओलांडून ध्कनी प्रदूषण करीत असल्यास त्यांच्याकर कारकाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी दिली.
























































