सूर्य आग ओकतोय, सोलापुरात पारा 44.4 अंशांवर

राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असून तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. रविवारी सोलापुरात या हंगामातील सर्वाधिक 44.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी सोलापूरचे तापमान 44 अंश सेल्सिअस होते.

गेल्या 13 ते 14 दिवसापासून सोलापूरचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर आहे. मे महिन्यातही असेच वातावरण असेल, असाही अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.