सोलापूरला देशातील गणवेश केंद्र बनवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूरमध्ये देशातील गणवेश केंद्र बनण्याची क्षमता असून महाराष्ट्राने  ठेवलेल्या उद्दिष्टय़ाला केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन वस्त्रद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त आयुक्त अजित चव्हाण यांनी दिले. चौथ्या ‘युनिफॉर्म, गारमेंट आणि फॅब्रिक मॅन्युफॅक्चर्स फेयरच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे-चावरे, आमदार सुभाष देशमुख, वस्त्रोद्योग विभागातील अधिकारी  सुशील गायकवाड, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर्स असोशिएशनचे संचालक अमितकुमार जैन उपस्थित होते. गोरेगावच्या मुंबई एक्झिबिशन सेंटर येथे हे प्रदर्शन 19 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.