
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सव्वालाखाहून अधिक मतदारांची नोंदणी झाली आहे. आठ लाख 9537 मतदार पात्र ठरले आहेत.
सोलापूर महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात 1 लाख 35 हजार 595 नवीन मतदारांची नोंद झाली आहे. या निवडणुकीसाठी शहरात 8 लाख 9537 मतदार पात्र असून, सर्वाधिक मतदार प्रभाग 13 मध्ये 27329, तर सर्वांत कमी मतदार प्रभाग क्रमांक 38 मध्ये 16537 इतके आहेत. एकूण मतदारांत चार लाख 11 हजार 305 पुरुष, तर तीन लाख 98 हजार 146 महिला मतदार आहेत. आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 1 जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत असून, 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.
























































