वॉटर कुलर, सौर झाडेही करताहेत वीज बचत ! मध्य रेल्वेची सौरऊर्जेद्वारे वार्षिक 1.45 कोटींची बचत

527

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात आता ऊर्जेचे शाश्वत आणि नैसर्गिक स्त्रोत वापरण्याचे चलन वाढत असताना भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत संपूर्ण कार्बनमुक्त पर्यावरण करण्याचे ध्येय्य निश्चित केले आहे. सौर ऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जेचा जास्तीत वापर त्यासाठी केला जात आहे. मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांच्या छतावर सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक इमारत, कल्याण रेल्वे शाळा, कल्याण रेल्वे रुग्णालय, कुर्ला आणि सानपाडा कार शेडमध्ये सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. तर चेंबूर, डॉकयार्ड, आसनगाव, आपटा, पेण आणि रोहा स्थानकांतही सोलर पॅनल बसविण्यात आले असून ऊर्जेच्या बिलामध्ये वार्षिक 1.45 कोटी रूपयांची बचत होणार आहे.

लोणावळा स्थानकांत ‘सौर झाडे’
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने पर्यावरण रक्षणासाठी अक्षय ऊर्जेचा वापर तसेच लाखो रुपयांची वीजेची बचत करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. हिल स्टेशन म्हणून खूपच लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळा स्थानकाचा सौर उर्जेचा वापर करणा-या रेल्वे स्थानकांच्या ‘एलिट क्लब’मध्ये समावेश आहे. लोणावळा स्टेशनमध्ये सोलर पॅनलद्वारे पेटणारे सौरऊर्जेचे बसविलेले दिवे ‘सौर झाडे’ अत्यंत आकर्षक आहेत.

सौर ऊर्जेवर चालणारे वॉटर कुलर
मध्य रेल्वेने पेण, आपटा, रोहा, नेरळ आणि लोणावळा स्थानकांवर प्रत्येकी एक सौरऊर्जेवर चालणारे वॉटर कूलर उपलब्ध करुन दिले आहेत. पॉलिप्रोपायलीन फिल्टर काट्रीजसह 45 एलपीएच कूलिंगच्या 150 लीटर स्टोरेज क्षमतेच्या

आपली प्रतिक्रिया द्या