यंदाची ग्रहणे कधी..?

या वर्षी 4 ग्रहण असणार आहेत. वर्षभरात 2 चंद्रग्रहण तर 2 सूर्यग्रहण असणार आहेत. हिंदुस्थानात ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणात काही गोष्टी करु नयेत असं सांगितलं आहे. विशेषत: गर्भवती महिलांना ग्रहण पाहू नये, त्यांनी भाज्या चिरू नये, असं अनेक समज आहेत. तर खगोलशास्त्र ग्रहणाकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहते. शास्त्रांसह अनेकांना ग्रहण पाहायला आवडतं. त्यामुळे प्रत्येकाला उत्सुकता असते वर्षातील ग्रहण कधी आहे हे जाणून घ्यायची.

कधी आहे चंद्रग्रहण आणि वेळ?
या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल गुरुवारी आहे. तर चंद्रग्रहण 5 मे 2023 शुक्रवारी म्हणजे बुद्ध पौर्णिमेला आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणाला ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्व आहे. या ग्रहणाचा काही राशींवर शुभ परिणाम दिसून येणार आहे. चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार 20:44 पासून सुरू होणार ते शनिवार 06 मे 2023ला मध्यरात्री 01:01 पर्यंत असणार आहे.

चंद्रग्रहण हिंदुस्थानात दिसणार का ?
वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आशियातील काही देशांसह, ऑस्ट्रेलिया, हिंदी महासागर आणि अंटार्क्टिकामध्ये दिसणार आहे. मात्र हिंदुस्थानात हे ग्रहण दिसणार नाही . त्यामुळे आपल्याला सुतक काळ पाळण्याची गरज नाही.

‘या’ राशीचं भाग्य चंद्रसारखं चमकणार
धनु
या राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण भाग्यशाली ठरणार आहे. व्यवसायात चांगल यश मिळणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. नवीन कामात प्रगती होईल आणि धनलाभ होणार. मालमत्ता आणि वाहन खरेदीचे चांगले योग तयार होत आहेत.

कन्या
या राशीच्या लोकांसाठी हा चंद्रग्रहण फायदेशीर ठरणार आहे. नवीन नोकरीची संधी चालून येणार आहे. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. अनेक वर्षांपासून सुरु असलेले वाद मिटतील, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

सिंह
या राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण शुभदायक असणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. परदेशी जाण्याचा योग आहे. वडीलधारांशी नातं चांगलं होईल. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

वर्षातील दुसरं चंद्रग्रहण कधी आहे?
या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण हे 28 ऑक्टोबर 2023 ला आहे. हे ग्रहण वर्षातील शेवट ग्रहण असून ते यूरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, पूर्वी अमेरिका आणि अफ्रीका या ठिकाणी दिसणार आहे.