मटणावरून उडाला खटका, मुलाने घेतला बापाचा जीव

murder

सामना ऑनलाईन । अमरावती

मटण नीट बनवलं नाही म्हणून झालेल्या वादातून एका मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याची हत्या केल्याचा प्रकार आंध्र प्रदेशमध्ये घडला आहे. या प्रकरणी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशमधील चित्तुर येथे ही घटना घडली. चेल्ला गुरुप्पा असं या मृत पित्याचं नाव असून वेंकट असं त्याच्या मुलाचं नाव आहे. रविवारी दुपारी चेल्ला आणि वेंकट सहकुटुंब जेवण करत होते. मात्र, मटणाची चव चांगली न लागल्याने चेल्ला चिडले आणि त्यांनी भरलेलं ताट त्यांच्या सुनेच्या तोंडावर फेकलं. या हल्ल्यामुळे त्यांची सून जखमी झाली. या हल्ल्यावेळी चेल्ला मद्यधुंद अवस्थेत होते. आपल्या पत्नीवर केलेला हल्ला पाहून चिडलेल्या वेंकटने चेल्ला यांना पकडून त्यांचे डोके भिंतीवर वारंवार आपटले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चेल्ला यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी वेंकट याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला असून त्याच्यासह अन्य कुटुंबीयांना अटक करण्यात आली आहे.