हनुमानाने संजीवनी सीतेसाठी आणली! चुकीचं उत्तर देऊन सोनाक्षी सिन्हा ट्रोल

995

सोशल मीडियावर ट्रोल होणं ही आता बॉलिवूड कलाकारांसाठी नेहमीची बाब झाली आहे. अगदी ड्रेसची घडी विस्कटण्यापासून ते केलेल्या वक्तव्यांपर्यंत कशाहीवरून ते ट्रोल होतात. पण, सोनाक्षी सिन्हा मात्र तिच्या चुकीच्या उत्तरावरून ट्रोल झाली आहे. रामायणाच्या प्रश्नाला तिने हनुमानाने संजीवनी सीतेसाठी आणली असं उत्तर दिल्याने नेटकऱ्यांनी तिची हुर्यो उडवायला सुरुवात केली आहे. #YoSonakshiSoDumb असा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड होताना दिसत आहे.

त्याचं झालं असं की, कौन बनेगा करोडपती या रियालिटी शोसाठी सोनाक्षीने विशेष अतिथी म्हणून स्पर्धकाची मदत करत होती. त्यावेळी स्पर्धकाला एक प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न होता, हनुमानाने संजीवनी कुणासाठी आणली या प्रश्नावर सोनाक्षीने सुरुवातीला ‘मला वाटतं सीता आणि रामासाठी संजीवनी आणली गेली असावी, असं उत्तर दिलं. पण, शेवटी लक्ष्मण या योग्य उत्तरावर ठाम राहत तिने बक्षिसाची रक्कम जिंकली.

पण, संजीवनी सीतेसाठी आणण्याच्या तिच्या या तर्काने तिने नेटकऱ्यांच्या हातात आयतं कोलीत दिलं. नेटकऱ्यांनी तिच्या या तर्काची मनसोक्त खिल्ली उडवायला सुरुवात केली. तिचं सामान्य ज्ञान पाहून अनेकांनी तिच्यावर मीम्स बनवून व्हायरल केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या