पालिका रुग्णालयांत रोबोटिक शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc

 केईएम, नायर, शीव आणि कूपर या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत लवकरच रोबोटिक शस्त्रक्रिया उपलब्ध होणार आहे. या शस्त्रक्रियेसंदर्भात रुग्णालय अधिष्ठात्यांच्या टीमचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच याविषयी पालिका आयुक्तांना अहवाल देण्यात येणार आहे.

रोबोटिक शस्त्रक्रिया सर्वसामान्यांच्या खिशाला परकडणारी नाही. मात्र आता सर्वसामान्यांनाही ही शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांतील अधिष्ठात्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. या टीमचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. पालिका आयुक्तांनी अहवालाला हिरका कंदील दाखकल्यास लककरच पालिकेच्या रुग्णालयांत रोबोटिक सर्जरीचा मार्ग मोकळा होईल.

मुंबई महापालिकेच्या तिन्ही रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, ‘पालिका रुग्णालयांत रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अधिष्ठात्यांच्या स्तरावर अभ्यास केला जातो. हा अभ्यास आता अंतिम टप्प्यात असून याचा अहवाल पालिका आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर पालिका रुग्णालयांत ही शस्त्रक्रिया केली जाईल.’

  •  पालिका रुग्णालयांत रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात तज्ञ डॉक्टरांना रीतसर प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. यासाठी पालिकेने कडाळा येथील एका भूखंडाकर स्कील डेक्हलपमेंट सेंटर सुरू करण्याचा विचार केला आहे. या केंद्रात सिम्युलेटिंग लॅबसह रोबोटिक सर्जरी सुरू करण्यात येईल.
  •  खासगी रुग्णालयांत ही शस्त्रक्रिया खूपच महागडी असल्याने पालिका रुग्णालयांत ही शस्त्रक्रिया सुरू झाल्यास गोरगरीब रुग्णांना याचा फायदा होईल. याशिवाय पालिकेच्या कैद्यकीय महाकिद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएट (पी.जी.) करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येईल.