अयोध्येत मशीद होती, आहे आणि राहील; मुस्लिमांनी घाबरू नये, सपा खासदाराने ओकली गरळ

1643

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिराचे भूमीपूजनाचा कार्यक्रम झाल्यापासून काही मुस्लिम नेत्यांकडून सातत्याने समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केली जात आहेत. ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’च्या अध्यक्षाने मंदिर पाडून मशीद उभारू असे हिरवे फुत्कार सोडल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील संभळ लोकसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे खासदार शफीकूर्रहमान बर्क यांनी गरळ ओकली आहे. अयोध्येत बाबरी होती, आहे आणि राहील; मुस्लिमांनी घाबरून जावू नये, असे विधान शफीकूर्रहमान बर्क यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने ताकदीच्या बळावर सर्वोच्च न्यायालयाला हा निर्णय घ्यायला लावला आहे, असे शफीकूर्रहमान बर्क म्हणाले. तसेच मुसलमान मोदी आणि योगी यांच्या भरवश्यावर नाही, तर अल्लाहच्या भरवश्यावर आहेत. त्यामुळे भूमीपूजनाच्या कार्यक्रमामुळे मुस्लिमांनी घाबरून जावू नये, असे शफीकूर्रहमान बर्क म्हणाले. तसेच न्यायालयात आमच्यावर अन्याय झाला आहे. आजही आमचं अल्लाहवर विश्वास असून तिथे मशीद होती, आहे आणि राहील. त्याला कोणीही मिटवू शकत नाही, असेही शफीकूर्रहमान बर्क म्हणाले.

मशिदीसाठी मंदिर पाडू – साजिद रशिद
इस्लामनुसार एखादी मशिद ही कायम मशिदच राहते. त्या जागी तुम्ही दुसरं काही बांधू शकत नाही. आम्ही असं मानतो की तिथे मशीद होती व कायम राहील. ती मशिद मंदिर पाडू बांधलेली नव्हती. मात्र आता कदाचित मंदिर पाडून मशिद बांधली जाईल’, अशी धमकीच ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिद यांनी दिली आहे.

लोकशाहीचा पराभव – ओवैसी
अयोध्येत झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ‘मी सुरुवातीपासून पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये अशी भूमिका मांडत आलो आहे. कारण ते कोणत्या विशिष्ट समाजाचे पंतप्रधान नाहीत, आणि हिंदुस्थानचा लोकशाही हा एकच धर्म असून आज याचा पराभव झाला’, असे ओवैसी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या