
मुंबई महानगरपालिकेच्या मंडयांमध्ये आता महिला बचत गटांना व्यवसायासाठी प्रशासनाकडून हक्काची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत पालिकेने सात ठिकाणे निश्चितही केली आहेत. यामुळे गरजू महिलांच्या आर्थिक सक्षमतेला हातभार लागणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी दिली.
नागरिकांना सुविधा देण्यासाठी महापालिकेच्या 91 मंडया सध्या कार्यरत आहेत. या मंडयांचा विकास करण्याचा उपक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे. यामध्ये माहीमचे सुप्रसिद्ध गोपी टँक मार्पेट, दादरचे क्रांतिसिंह नाना पाटील मार्पेट, नळबाजार परिसरातील मिर्झा गालिब मार्पेट आणि ग्रॅण्ट रोडच्या लोकमान्य टिळक मार्पेटचा कायापालट होत आहे. या पाचही मंडयांमध्ये 2 हजार 596 गाळेधारक आहेत. याशिवाय आगामी काळात मंडयांच्या विकासात बचत गटांच्या आर्थिक सक्षमतेसाठी मंडयात भाडेतत्त्वावर जागा देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
असा होणार फायदा
– महागडय़ा मुंबईत गरजू महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटाच्या व्यवसायासाठी जागा मिळणे मुश्कील ठरते. खासगी जागा घेणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर पालिका मंडयांमध्ये जागा उपलब्ध करून देणार आहे.
– गरजू महिलांना रोजगार देण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून शिलाई मशीन, घरघंटीचे वाटप करण्यात येते. शिवाय महिलांना पालिकेच्या पे अॅण्ड पार्किंग कंत्राट महिला बचत गटांना देण्याचाही निर्णय याआधी घेण्यात आला आहे.
35 हजार फेरीवाल्यांना 10 हजारांचे कर्ज
– पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत पालिकेकडे अर्ज केलेल्या 35 हजार फेरीवाल्यांना 10 हजारांचे कर्ज बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. पालिकेकडून बँकेला शिफारस करताना संबंधित फेरीवाल्याकडे परवाना आहे की नाही हे न पाहता वॉर्ड अधिकाऱयांच्या तपासणीनंतर बँकेला कळवण्यात येते. आगामी काळात वितरीत करण्यात येणाऱया कर्जाची रक्कम वाढवण्यावरही विचार सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.


























































