स्पेनसेशनल; स्पेनच्या महिला पहिल्यांदाच फिफा वर्ल्ड कपसाठी भिडणार

अखेर महिला फिफा  वर्ल्ड कपला नवा जगज्जेता लाभणार. ओल्गा कार्मोनाने अखेरच्या दोन मिनिटांत केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर उपांत्य सामन्यात स्वीडनचा 2-1 असा पराभव केला आणि प्रथमच फिफा वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली. एवढेच नव्हे तर स्वीडनचा पराभव झाल्यामुळे अंतिम फेरी गाठणारे दोन्ही संघ प्रथमच जगज्जेतेपदासाठी भिडतील. बुधवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना रंगणार असून या दोन्ही संघांनी एकदाही अंतिम फेरी गाठलेली नाहीत्यामुळे दोन्ही संघ प्रथमच अंतिम फेरी खेळणारे आहेत.

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या वर्ल्ड कप उपांत्य सामन्यात दोन्ही संघांतील पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटले. अखेर 81व्या मिनिटाला सलमा पॅसलने स्पेनसाठी पहिला गोल नोंदवला. मात्र 88 व्या मिनिटाला रीबेका ब्लोमवीस्टने स्वीडनला बरोबरी साधून दिली. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेपर्यंत लांबणार असे वाटू लागले, मात्र कार्मोनाने 89 व्या मिनिटाला महत्त्वाचा गोल झळकावून स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. याआधी कधीही स्पेनला
संघ जगज्जेतेपदासाठी भिडला नव्हता. त्यामुळे स्पेनच्या महिला पहिल्या दावेदार आहेत.

आता बुधवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात 43 हजार फुटबॉल चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे दुसऱया सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया खेळणार असल्यामुळे चाहत्यांचा आकडा निश्चितच त्याच्यापेक्षा मोठा असणार, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.